कला, संस्कृती आणि एआयचे डिजिटल भावविश्व
अतार्किक बोलण्यातून किंवा कृतीतून विनोद निर्माण होत असतो. असंबद्ध बोलणे, कृती करणे, हे विनोदनिर्मितीतील प्रमुख तंत्र आहे. आपण दररोजच्या धकाधकीच्या धबडग्यात विनोद निर्माण करून थोडा विसावा शोधत असतो. व्यक्तीला कामाच्या ताणतणावात तेवढाच विरंगुळा आणि त्यातून आनंद मिळत असतो. कला, सांस्कृतिक कार्यक्रमांतून होणारी आनंदनिर्मिती मनाला स्वस्थता आणि शांतता मिळवून देते. ह्याच आनंदाचा, सुखाचा निरंतर शोध पुढे …